Why this kolaveri di - Marathi Version -Kolhapuri Mard Gadi
Why this kolaveri di - Mara... Lyrics & Chords
Marathi “COVER” Version of the hit “Why This Kolaveri Di” originally sung by DHANUSH, Music : Anirudh Ravichander
मित्रांनो, मी हाय कोल्हापुरी , लई भारी.
चला वाजवा.
आम्ही कोल्हापूरी … जगात भारी.
मी हाय कोल्हापुरी कोल्हापुरी मर्द गडी – ४ वेळा.
रांगड वागणं , बोलणं चालणं, शेलक शेलक बोलणं.
साध्या साध्या बोलण्या मधन , शिव्यांच ते पेरणं||१||
मी हाय कोल्हापुरी कोल्हापुरी मर्द गडी — २ वेळा.
पायात चपल कर्रा कर्रा , फेट्याचा झुलतो तुर्रा.
तालमीत जाऊन बैठका मारून,शोभे पैलवान खर्रा||२||
मी हाय कोल्हापुरी कोल्हापुरी मर्द गडी — २ वेळा.
मित्रानो , तुम्हाला वाटल नुसत्या गप्पा मारतोय……
गप्पा,गप्पा, गप्पा,गप्पा, नाहीत नुसत्या गप्पा.
पटलच आता.
आमचं बोलणं,चालणं,वागण पाहिलंत.
आता आमचा खाना आणि बाणा कसा तो बघा.
हुं ss तांबडा रस्सा…. आमचं खाण बघा….
तांबडा रस्सा , पांढरा रस्सा वरपतो भुर्र भुर्र.
नाश्त्याला वडा , कट मिसळ आणि चहा फुर्र फुर्र.
नव नव रोज नव , हॉटेल देतंय चव.
खाव प्यावं द्यावं घ्याव , होतया मग नाव.
राजा शाहूच आमचं नात , नाही कुणा भीत.
चांगल्याशी चांगल वाईटाशी वाईट, हाय मराठा जात||३||
मी हाय कोल्हापुरी कोल्हापुरी मर्द गडी – ४ वेळा.
कोल्हापुरी … जगात भारी.
रचना व गायन : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे — ०६/१२/२०११
http://kavyarangmaze.blogspot.com/
Info
January 06, 2012
Stats
- 86 Plays
- 0 Favorites
- 1 Likes
- 0 Comments
- 0 Why this kolaveri di - Mara... MP3 Download
Search Keywords


No comments yet. Be the first to comment